Tuesday 6 December 2016

फॉर्च्युनच्या 50 कॉर्पोरेट्स हेड्स लिस्टमध्ये भारतीय वंशाचे 4 व्यक्ती


बिझनेस मॅगझिन फॉर्च्युननं देशभरातील 50 ग्लोबल कॉर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एचडीएफसीचे एमडी आदित्य पुरी, मायक्रोकार्डचे सीईओ अजय बंगा आणि एओ स्मिथचे सीईओ अजित राजेंद्र यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.


बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनच्या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे पहिल्या स्थानी विराजमान आहेत. भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांना पाचवं स्थान बहाल करण्यात आलं आहे. अजित राजेंद्र 34व्या तर आदित्य पुरी यांनी 36व्या स्थानी झेप घेतली आहे. अजय बंगा हे 40व्या स्थानावर आहेत. तसेच, या यादीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही स्थान मिळालं आहे.



दरम्यान, 2014 साली नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचा कार्यभार सांभाळल्यानंतर कंपनीचा कायापालट केला आहे. नाडेला यांनी कंपनीचं कम्युटिंग पर्सनलवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्याप्रमाणेच त्यांचं क्लाऊड कम्प्युटिंग आणि दुस-या विभागातील कारभारावरही लक्ष आहे, असं नाडेलांसंदर्भात बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनमध्ये लिहिलं आहे. तर आदित्य पुरी यांनी एचडीएफसी बँकेची गेल्या दोन दशकांपासून कमान सांभाळली असून, या काळात कंपनीची आर्थिक उलाधाल कमालीची वाढली आहे, असंही बिझनेस मॅगझिन फॉर्च्युननं लिहिलं आहे.

Source :- http://www.lokmat.com

1 comment: